« मी निघालो »
शेळीचे ते आयुष्य जगने ना जमले
गळ्याच्या घंटा तोडून मी निघालो
गाळलेत जरी अश्रू सत्याच्या बळीचे
बंदीस्त त्या भिंती फोडून मी निघालो
उचलून माझा ज्यांनी आवाज ऐनवेळी
कृतज्ञ त्यांस पुनः स्मरून मी निघालो
लेखनीचे ज्यांनी केले पाळीव पिल्लू
विचारांनी त्यांना कोळून मी निघालो
कुत्सितपणाने दिले लाख क्लेश ज्यांनी
परिक्षणाचा भूंगा सोडून मी निघालो
No comments:
Post a Comment