« मी आणि तू »
मी मंदिराची पायरी
तु देवाचा कळस
तु अंगणातली तुलसी
मी रानातला पळस
मी तप्त लाव्हा
तू गार वारा
मी भ्रमणारा ग्रह
तू तेजस्वी तारा
मी शुभ्र आकाश
तू हिरवी धरा
विरहात तुझ्या
पावसाच्या धारा
मी उजाड डोंगर
तू प्रवाही नीरा
तू प्रेमाचा सागर
मी छोटासा झरा
मी तुझाच गंध
तू माझी कविता
मी तुझा छंद
मी तुझा सागर
तु माझी सरीता
विशाल असलो तरी
तुझ्याविणा रीता
•••
रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. ८८०५७९१९०५
३० डिसेंबर २०१८ च्या दै. तरुण -भारत (नागपूर) मधे प्रकाशित
(३ फेब्रुवारी २०१९ च्या दै. बलशाली भारत मधे प्रकाशित)
(४ फेब्रुवारी २०१९ च्या दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित)
१ ऑगस्ट २०१९ च्या दै. पुण्यनगरीत प्रकाशित