Sunday 21 April 2019

अवकाळी

कविता

• अवकाळी •
जवा पायजे तवा
आला नाय गड्या
आता मातरं गारा
बरसतो केवढ्या

पिक आलं होतं
कसंतरी रं हाती
अचानक येऊन
केली सारी माती

ओला होऊन सडेल
पडला सम्दा बहर
सवड न देता तू
केला एवढा कहर

झोडून काढलं असं
माल सारा नासला
शेंडबहर होता थोडा
तोही आता कसला?

गारपिटीने ह्या देला
दगा अवकाळी
नुकसानच लिवलं
हाय असं भाळी

• रघुनाथ सोनटक्के


(२१ एप्रिल २०१९ दै. तरुण-भारत, नागपूर)

Raghunath Sontakke
 

No comments:

Post a Comment