ब्वाॅ-बाजीच्या नावानं
चाल्ले लुबाळ्याचे धंदे
देवाच्या नावानं अथी
मान्सबी व्हतात अंदे
• रघुनाथ सोनटक्के
सावळे अंबर, हिरवी धरणी
सप्तरंगी धनू, अजब करणी
मेघ तो नादतो, सतार सरींचे
आलाप छेडीतो, पवन उरीचे
तृण इवलेसे, दवबिंदू कण
अलगद वाहे, डोळ्यातून मन
अंधार मुरतो, छेडीत तार
झोपडी झेलीते, गारांचा मार
दुधाळ निर्झर, वाहे खळखळ
नदीच्या भेटीस, अंतरी तळमळ
सुगंध मातीस, वीज तडतड
अंकुर फुलतो, झेलीत ही झड
• रघुनाथ सोनटक्के
मो. ८८०५७९१९०५