Monday, 8 October 2018

माह्या विदर्भ

माह्या विदर्भ

माह्या विदर्भाच्या मातीत
आपुलकीचा गंध
माणुस श‍ोधायले शिकोते
तुकळोजी रास्ट्रसंत

डेबू, तुकड्याबाबांनी केली
मनं आमची साफ
दया करा प्राणिमात्रावर
म्हणे करू नका पाप

देव आम्चा शेगावीचा
गजानन साधा
चमत्कारातुनही देला
उपदेस गाढा

पंजाबराव देस्मुखानी देला
शिक्षणाचा वसा
क्रुषीचाबी अन्भव त्यानं
देला मोलाचा

वावरात आमी पिकोतो
कापसाचं सोनं
सितादही करुन फेऴतो
किस्नाचं रुनं

सातपुळ्याच्या कुशीत अा‍माले
मिळते आधार अन् मेवा
काजुबदामाले पाळ्ंते मांगं
गोळंबी मोहफुलाचा ठेवा

याच म‍ातीत माहेर
जिजाऊचं सिंदखेडराजा
घळवला तिच्या कुशिनं
शिवाजी राजा

याच मातीनं देल्ला आमाले
विनोबाअन् आमटे बाबा
कौडण्यपूरच आम्ची काशी
माहूर आम्चं काबा
रघुनाथ सोनटक्के

वऱ्हाडी बखर मधे प्रकाशित 
२० जानेवारी २०१९ च्या दै. विदर्भ मतदार मधे प्रकाशित
Raghunath Sontakke, Vidarbh

No comments:

Post a Comment