« शब्द »
शब्दच होतात कधी शिपंल्यातील मोती
धन, देह नश्वर, शब्दच उरतात अंती
वाफ होऊन तरंगत राहते बाकी आसमंती
शब्दच पसरवतात हिंसा, भेद, मत्सर विखारी
कुणी शब्दांचा रसिक, तर कुणी असतो भिकारी
कुणी करावा जप शब्दांचा, कुणी कराव्या ढाली
कुणी व्हावा अंगार, तर कुणी कराव्यात मशाली
शब्दानेच होतो ‘वाल्मिकी’, कुणी होतो मवाली
शब्दच होतात गोड, बाकी सारं ‘त्याच्या’ हवाली
शब्द कायदा, शब्द वायदा, कुणाचा असतो कव्वाली
त्यानेच होते शिक्षा, समाधान, अन् ‘भावा’ची वसुली
No comments:
Post a Comment