माह्या विदर्भ
माह्या विदर्भाच्या मातीत
आपुलकीचा गंध
माणुस शोधायले शिकोते
तुकळोजी रास्ट्रसंत
डेबू, तुकड्याबाबांनी केली
मनं आमची साफ
दया करा प्राणिमात्रावर
म्हणे करू नका पाप
देव आम्चा शेगावीचा
गजानन साधा
चमत्कारातुनही देला
उपदेस गाढा
पंजाबराव देस्मुखानी देला
शिक्षणाचा वसा
क्रुषीचाबी अन्भव त्यानं
देला मोलाचा
वावरात आमी पिकोतो
कापसाचं सोनं
सितादही करुन फेऴतो
किस्नाचं रुनं
सातपुळ्याच्या कुशीत अामाले
मिळते आधार अन् मेवा
काजुबदामाले पाळ्ंते मांगं
गोळंबी मोहफुलाचा ठेवा
याच मातीत माहेर
जिजाऊचं सिंदखेडराजा
घळवला तिच्या कुशिनं
शिवाजी राजा
याच मातीनं देल्ला आमाले
विनोबाअन् आमटे बाबा
कौडण्यपूरच आम्ची काशी
माहूर आम्चं काबा