Monday, 3 September 2018

माझं प्रेम

« माझं प्रेम »

तुझ्यावर माझं किती प्रेम
विचार माझ्या मनाला
चंद्रतारे तर नाही देवु शकेन
पण प्राणही लावेन पणाला

मी खुप प्रेम करतो सखे 
अन् म्हणतेस त्यात काय वेगळं?
झाकून बघ माझ्या डोळ्यात 
सामावलं आहे त्यात सगळं 

मी तुझ्यावर किती प्रेम करतो 
देवू तुला कशाची ग्वाही 
पाहून घे डोळ्यात माझ्या 
चिरून बघ काळजालाही 

खोटंखोटं का होईना हळूच  
एकदा माझ्याकडे बघ 
भरलयं किती माझ्या डोळ्यात प्रेम 
कळेल तुला मग

डोकाऊन बघ जरासे मनात 
छेडून बघ मनाच्या तारा 
लिहून काढ प्रेमाच्या शाईने 
माझ्या मनाचा कागद कोरा 
रघुनाथ सोनटक्के 
तळेगाव दाभाडे, पुणे 
मो. ८८०५७९१९०५

६ सप्टेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित
 ३० डिसेंबर २०१८ च्या दै. विदर्भ मतदार मधे प्रकाशित

मी आणि तू

« मी आणि तू »

मी मंदिराची पायरी
तु देवाचा कळस
तु अंगणातली तुलसी
मी रानातला पळस

मी तप्त लाव्हा
तू गार वारा 
मी भ्रमणारा ग्रह 
तू तेजस्वी तारा

मी शुभ्र आकाश
तू हिरवी धरा
विरहात तुझ्या
पावसाच्या धारा

मी उजाड डोंगर
तू प्रवाही नीरा
तू प्रेमाचा सागर
मी छोटासा झरा

तू सुंदर फुल 
मी तुझाच गंध 
तू माझी कविता
मी तुझा छंद 

मी तुझा सागर
तु माझी सरीता
विशाल असलो तरी 
तुझ्याविणा रीता
रघुनाथ सोनटक्के 
तळेगाव दाभाडे, पुणे 
मो. ८८०५७९१९०५

१८ डिसेंबर २०१८ साप्ताहिक सायबर क्राईम मध्ये,  २५ डिसेंबर २०१८ च्या दै. स्वाभिमानी छावा, तसेच २७ डिसेंबर २०१८ च्या दै. लोकमंथन मधे प्रकाशित (https://www.readwhere.com/read/1953901#page/4/2)
 ३० डिसेंबर २०१८ च्या दै. तरुण -भारत (नागपूर) मधे प्रकाशित
(३ फेब्रुवारी २०१९ च्या दै. बलशाली भारत मधे प्रकाशित) 
(४ फेब्रुवारी २०१९ च्या दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित)
१ ऑगस्ट २०१९ च्या दै. पुण्यनगरीत प्रकाशित

 
  Raghunath Sontakke 
Raghunath Sontakke Raghunath Sontakke Raghunath Sontakke