Friday 10 June 2016

प्रेमपत्र

 प्रेमपत्र


मी दिलेलं पत्र
असेल का अजुन तुझ्याकडे?
का दिलं असेल फेकुन 
अनाहूत म्हणून!

मथळा तर नव्हताच त्याला
का वाचत असशील,
माझ्या प्रेमाचा आशय
कधीतरी...

जीव आेतला होता मी त्यात
शिल्पकार जसा मुर्तित अोततो तसा
कितीतरी पत्रे जन्मुन अल्पायुषी ठरलीत त्याआधी
पण याचा जन्मच झाला होता 
तुझ्या हाताला स्पर्शण्याचा

मनाच्य‍ा आतुन प्रसवलेली कविता
लिहली होती मी त्यात
उमगलीच नाही वाटतं तुला!

गुलाबाचं फुलही होतं त्यात
गंध नसेलच आता 
पण माझ्या प्रेमाचा दरवळ
नक्कीच असेल त्याला...

मोराचं पिसही दिसेल तुला
जर का निक्षुन बघशील
कारण तुला बघुनच माझं मन
पिसार्यागत फुलायचं...
आणि नाचायचं मनमुराद
मोरागत...

रक्ताने जरी लिहलं नसलं
तरी माझं काळीजच होतं ते
जे तू चिरलं तर नाही
पण ...
अजुनही तु्झ्या होकाराची वाट पाहतंय
तु्झ्याशी संवाद साधायला

आता फक्त उरलीय कविता
लिहित असतो तुला पोहचत असेल म्हणुन
भलेही कुणी...
रडगाणं म्हटलं जरी तिला...
रघुनाथ सोनटक्के
         ८८० ५७९ १९०५
८ जानेवारी २०१९ ला दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित