Wednesday 25 May 2016

दुस्काळ

दुस्काळ

म्या जगाचा पोशिंदा
खायला ना उरला घास
या दुस्काळापायी पडला
माज्या गळ्यामंदी फास

कोरड्या पडल्या हीरी
सुकले नदी नाले
टक लावुन बसलोय
सपाट आभायाले

भुई झाली कोरडी
आभाय झालं सुनं
पाण्याविना आता
जगावं कसं जीणं

खाऊ कसं घास
ऊपाशी गोठ्यापुढं
सुकली बाभळी
गुरांची झाली हाडं

सपान डोळ्यामंदी
होतं तसं मुरलं
कर्ज, उसनवारीतच
आलं तसं सरलं

फाटक्या माज्या धोतरवाणी
फ़ाटली धरणीमाई
ओवायला पुरणां ही
सरकारी भरेपाई

बि-बियाणंसाठी आता
ठेवू म्हंतु साैभाग्याचं लेणं
हवालदील झालंय हे
माजं फाटलेलं जीणं

~ रघुनाथ सोनटक्के
    तळेगाव, पुणे
    ८८० ५७९ १९०५
रोखठोक दिवाळी अंक २०१७ मध्ये प्रकाशित
३  आणि १४ जानेवारी २०१९ च्या दै. स्वाभिमानी छावा , 
५ जानेवारी २०१९ ला दै. डहाणू मित्र मधे   
१० जानेवारी २०१९ च्या दै. वाचकमंच प्रकाशित 
 फेब्रुवारी २०१९ च्या दै. बलशाली भारत  मधे प्रकाशित 
एप्रिल २०१९ च्या मासिक चपराक मधे प्रकाशित
१२ मे २०१९ दै. संघर्ष समाजवादाचा मधे प्रकाशित 
१७ मे २०१९ दै. बंधुप्रेम मधे प्रकाशित 
२ जून २०१९ लोकशाही वार्ता (प्रतिबिंब पुरवणी) मधे प्रकाशित 
९ जून २०१९ दै. विदर्भ मतदारमधे प्रकाशित 


Raghunath Sontakke  Dushkal Raghunath Sontakke