« आवडतं का तुला ? »
तुझ्यासाठी झुरणं
मागोमाग फिरणं
रात्ररात्र जागणं
वेड्यासारखं वागणं
आवडतं का तुला ?
मित्रांनी चिडवनं
तुझ्यावरून खिल्ली उडवणं
भेटण्यासाठी तू रडवणं
कुणाशी भिडवणं
आवडतं का तुला ?
तुझ्यासारखा मला होतो त्रास
जगण्यासाठी हवाय ना श्वास
तू आहेस माझ्यासाठी खास
तुझ्यावरचा विश्वास तोडणं
आवडतं का तुला ?
• रघुनाथ सोनटक्के