Thursday, 13 June 2019

पहिला पाऊस




पहिला पाऊस

जीव कासाविस
शुष्क सारी भुई
सगळ्यांची होई
लाहीलाही

दाटला अंधार
सुसाटला वारा
आसमंत
धरा
 गंधाळली

टप टप थेंब
सरीवर सरी
तृप्त सृष्टी सारी
प्राणीमात्र

गर्द झाडेवेली
नटली अवनी
पक्षी गातो गाणी
रानोमाळी

रम्य चराचर
दृश्य मनोहर
हर्ष सभोवार
दाटलेला

• रघुनाथ सोनटक्के ‎


११ जून २०१९ दै. औरंगाबाद केसरी मधे प्रकाशित
१८ जून २०१९ च्या साप्ताहिक सायबर क्राईम मधे प्रकाशित
१५ जून २०१९ च्या दै. स्वाभिमानी छावा मधे प्रकाशित
१९ जून २०१९ च्या दै. वाचकमंच मधे प्रकाशित  
२७ जून २०१९ च्या दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित 
साप्ताहिक झी मराठी दिशा, २१ जून २०१९ ला प्रकाशित
http://www.zeemarathidisha.news/Details?NewsId=5624415757003576617&title=pahila%20paus&SectionId=4805737089856539540&SectionName=%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE 

 

Tuesday, 21 May 2019

उन्हाळा

  « उन्हाया »
डोळ्या लागल्या धारा
प्यायला ना थेंब उरला
दुस्काळात काहिलीने
उन्हाया जीवघेणा ठरला

रानं सुकलेत सारे
हिरीबी कोड्ड्याठण
माणसं ताहानलेली
अन् उपाशी पशूधन

पाण्यासाठी वणवण
थेंबी कुठंबी दिसंना
अंग भीजं धारांनी
बाहेर उन्हबी सोसंना

ओस झाल्या वस्त्या
सुने पडले गाव नी गावं
पावसा रे मोठ्ठं दान
धरणीला तू लवकर द्यावं
रघुनाथ सोनटक्के
३१ मे २०१९ च्या दै. प्रीतीसंगम मधे प्रकाशित
१ जून २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित 
जून २०१९ च्या दै. आपला महाराष्ट्र मधे प्रकाशित 
Raghunath Sontakke

    « उन्हाया »
डोयाले लागल्या धारा
प्याले ना थेंब उरला
दुस्कायात किती हा
उन्हाया जीवघेणा ठरला

वावरं सुकले सारे
हिरीबी कोळ्ळ्याठण
माणसं ताआनलेली
अन् उपाशी हाय गावधन

पाण्यासाठी वणवण
थेंबी कुटीच दिसेना
आंग भीजे धारायनं
उन्हाया हा सोसेना

ओस झाल्या वस्त्या
सुने पळ्ले गावंच्या गावं
पावसा तू मोट्टं दान
आता धरणीले रे दयावं
रघुनाथ सोनटक्के



Tuesday, 7 May 2019

मी निघालो

« मी निघालो »

शेळीचे ते आयुष्य जगने ना जमले
गळ्याच्या घंटा तोडून मी निघालो

गाळलेत जरी अश्रू सत्याच्या बळीचे
बंदीस्त त्या भिंती फोडून मी निघालो

उचलून माझा ज्यांनी आवाज ऐनवेळी
कृतज्ञ त्यांस पुनः स्मरून मी निघालो

लेखनीचे ज्यांनी केले पाळीव पिल्लू
विचारांनी त्यांना कोळून मी निघालो

कुत्सितपणाने दिले लाख क्लेश ज्यांनी
परिक्षणाचा भूंगा सोडून मी निघालो
• रघुन‍ाथ सोनटक्के

७ मे २०१९ च्या साप्ताहिक सायबर क्राईम (औरंगाबाद) मधे प्रकाशित
१३ मे २०१९ दै. तरुण भारत (नागपूर) मधे प्रकाशित माझी कविता.
४ ऑगस्ट २०१९ दै. आपला महाराष्ट्र मधे प्रकाशित
  
Raghunath Sontakke

Sunday, 21 April 2019

अवकाळी

कविता

• अवकाळी •
जवा पायजे तवा
आला नाय गड्या
आता मातरं गारा
बरसतो केवढ्या

पिक आलं होतं
कसंतरी रं हाती
अचानक येऊन
केली सारी माती

ओला होऊन सडेल
पडला सम्दा बहर
सवड न देता तू
केला एवढा कहर

झोडून काढलं असं
माल सारा नासला
शेंडबहर होता थोडा
तोही आता कसला?

गारपिटीने ह्या देला
दगा अवकाळी
नुकसानच लिवलं
हाय असं भाळी

• रघुनाथ सोनटक्के


(२१ एप्रिल २०१९ दै. तरुण-भारत, नागपूर)

Raghunath Sontakke
 

Monday, 25 March 2019

मामाची पोर

मामाची पोर
माझ्या मामाची शाली भलकसी लाजते
दिसलो कि मी तिले खुदूखुदू हसते

गेलो मी बाहेर कि टेप लावून नाचते
संध्याकाळी माझ्यादेखत शिंगार करून सजते

नसलं घरी कुणी तवा जवळ येऊन बसते
पिक्चरात जशी हिरोमांग हिरोईन असते

लग्नाची निगाली गोठ कि खुदूखुदू हसते
घडीघडी करत इशारे, जवा घरी कुणी नसते

दिवसातून दोन वेळा गोल साठी नेसते
हिडगावते अशी कि स्वत:ले हिरोईन समजते

अशा शालीसारखी कुठे मामाची पोर असते
मनात काय चालू आहे नेहमी मले पुसते

अशी मामाची पोर नखरे करत असते
आपून पाह्यलं साधंसुधे आपल्याच गळ्यात बांधून भेटते
• रघुनाथ सोनटक्के

प्रकाशित कविता

Sunday, 24 March 2019

आठवण

« आठवण »

मनाच्या खोलीत
हृदयाच्या कप्प्यात
प्रेमाच्या शाईत
कवितेच्या वहीत
एकतरी पान तुझं लिहिलं
खरंच तुझी आठवण येईल

ढग येतील भरून
वारा जाईल शिरून
पाऊस घेईल घेरून
अंग टाकेन भिजून
मन मात्र कोरडं होईल
खरंच तुझी आठवण येईल

• रघुनाथ सोनटक्के

२५ मार्च २०१९ च्या दै. बलशाली भारत (५ एप्रिल २०१९) आणि मराठवाडा संचार मधे प्रकाशित

Sunday, 17 March 2019

पळसाचं झाड

« पळसाचं झाड »

किती सोसतोय
विरहाच्या झळा
रानामधे एकटा
राहिलो मी तोळा

आशेचे अंकूर
प्रेम‍ाचा फुलोरा
वैरी तो माझा
हाताचा बिलोरा

सालाने चढलाय
माझ्या गावात बहर
भरू दे रंगाने
तुझं लखलखतं शहर

कोळून फुल‍ांना
काढून घे रंग
रंगेन तुझे वस्त्र
घट्ट माझ्या संग

वर्षातून एकदाच
आठवण तू काढ
वाट पाहते बघ
ते पळसाचं झाड
रघुनाथ सोनटक्के 

१६ मार्च २०१९ च्या दै. युवा छत्रपती, बलशाली भारत आणि मराठवाडा संचार मधे प्रकाशित 
२४ मार्च २०१९ च्या दै. तरुण भारत (नागपूर) मधे प्रकाशित  
१२ मे २०१९ दै. विदर्भ मतदारमधे प्रकाशित, ९ जून २०१९ दै. गाववाला मधे प्रकाशित
१३ जून २०१९ दै. गाववाला मधे प्रकाशित