Showing posts with label Krushkonnati. Show all posts
Showing posts with label Krushkonnati. Show all posts

Friday, 5 June 2020

माह्या बाप

माह्या बाप
हाळाची काळं करून
बाप माह्या राबला
खाऊन मिठभाकर
पिल्लायसाठी जगला

बरसला का मिरूग
ढेकलं लागतीन ऊलू
सपन पायते बाप
वावर लागीन फुलू

रातदिसं एक करून
मातीत घाम त्यानं गायला
घरासाठी त्याच्यावाल्या
राब राब राबुन राह्यला

सोसून उन्हाच्या झावा
जमीन त्यानं कसली
थकूनभागून नजर त्याची
वाट पायत बसली

कोळ्ल्या, गरम मातीत
वळ्ल्या त्यानं रेघा
मीरगाची वाट पायते
बाप माह्या रे ढगा

केली मशागत शेताची
उन पाऊस झेलून
जींदगीभर फिटनार नाई
त्याच्या कष्टायचं ऋन
• रघुनाथ सोनटक्के
 पुणे, मो.८८०५७९१९०५


६ जून २०२०, दै. आदर्श महाराष्ट्र आणि  ११ जुन २०२० च्या साप्ताहिक कृषकोन्नतीमधे प्रकाशित   
https://deshonnati.digitaledition.in/2709351/Krushkonnati-2014/11th-Jun-Krushkonnati#page/8/2
 १७ जून २०२०, दै. जनमाध्यम